ऑनलाईन रोजगार
मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र यांच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी प्राप्त करुन
देण्यासठी मंगळवार दि. 22 ते 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील
उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करण्यात यावी.
जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरिल संकेतस्थळावर
स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पत्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर
करावा. अधिक माहितीसाठी 02362-228835 किंवा 9403350689 येथे संपर्क साधावा. असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
00000
राज्यस्तरीय बोधचिन्ह व
बोधवाक्य स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य
पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या
विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह व बोधवाक्य तयार करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणी
व स्वच्छता विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी दिली.
राज्यस्तरीय
बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेसाठी स्पर्धकांनी ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण
स्वच्छता या विषयावर बोध होईल असा लोगो तयार करुन पाठविण्यात यावा. ब्रीदवाक्य मोजक्य
शब्दात व मराठीतून असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी असावे. सहभागी स्पर्धकांनी
लोगोची सॉफ्ट कॉपी पाठविणे महत्वाचे आहे. स्पर्धकांनी स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क
क्रमांक आदी माहिती देणे आवश्यक आहे. लोगोची
अंतिम निवड करण्यात येईल, त्यांना कलर फाईल उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. लोगोची
अंतिम निवड करण्याचा संपूर्ण अधिकारी राज्य पाणी
व स्वच्छता मिशनला राहणार आहे.
स्पर्धकांनी
लोगोची सॉफ्ट कॉपी directorwsso@gmail.com
व iecwsso@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्यात
यावी. बोधचिन्ह व बोधवाक्य यांची अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांना रक्कम रु.
50,000/- (पन्नास हजार फक्त) देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार
दि. 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील
कलाकार, विद्यार्थी व जाहिरात संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद
पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे.
0000
मौजे सावंतवाडी
सबणीसवाडा येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : सावंतवाडी
तालुक्यातील मौजे- सावंतवाडी सबणीसवाडा येथील
अजिक्य रॉयल बिल्डींग मधील तिसरा मजला घर क्र. डी/302 सदनिकेचा 25 चौ.मी. परिसर कोरोना
विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
सावंतवाडी तालुक्यातील
मौजे मळेवाड
कुंभारवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : सावंतवाडी
तालुक्यातील मौजे- मळेवाड कुंभारवाडी
येथील घर क्र. 89 चा 30 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
मौजे दोडामार्ग
ग्रामीण रुग्णालयातील
शासकीय
निवासस्थान येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : दोडामार्ग
तालुक्यातील मौजे- दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील शासकीय निवासस्थान इमारतीमधील
क्र. 4/1 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून
जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
मौजे दोडामार्ग
भोसले कॉलनी
पालयेकर इमारत येथे
कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : दोडामार्ग
तालुक्यातील मौजे- दोडामार्ग येथील भोसले कॉलनी पालयेकर इमारत एफ-01, 1173 चा परिसर
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला
आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
दोडामार्ग
तालुक्यातील मौजे दोडामार्ग भोसले कॉलनी, सर्वोदयनगर
व मौजे कोनाळ
गावठणवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : दोडामार्ग
तालुक्यातील मौजे- दोडामार्ग भोसले कॉलनी येथील घर क्र. 983-2 चा परिसर, दोडामार्ग
सर्वोदयनगर येथील घर क्र. 775 चा परिसर आणि मौजे कोनाळ गावठणवाडी येथील घर क्र.
531 व 532 चा परिसर कोरोना विषाणुचा
प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी
रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने,
वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना
येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा,
सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार
व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी,
कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर
यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment