जिल्ह्यात एकूण 1153 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1061

-         जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 11 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1153 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 75 व्यक्तींचे कोरोना तपासणी हवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.                

अ.क्र

विषय

संख्या

प्रयोगशाळा अहवाल

1

एकूण अहवाल

19044

2

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

2249

3

निगेटिव्ह आलेले अहवाल

16420

4

प्रतिक्षेतील अहवाल

375

5

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण

1061

6

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या

35

7

डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण

1153

अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती

8

गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 

8652

9

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती

4527

00000

 

कणकवली तालुक्यातील

मौजे कणकवली शहर बाजारपेठ, पटकीदेवी,

भालचंद्रनगर व बांधकरवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 11 :  कणकवली तालुक्यातील मौजे- कणकवली शहर बाजारपेठेतील घर क्र. 05/312-अ,  पटकीदेवी घर क्र. 05/338, भालचंद्रनगरमधील घर क्र. 04/226 व बांधकरवाडी घर क्र. 04/226 विठोबा राणे कंपाऊंड या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

 

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राजीव गांधी  मानव सेवा पुरस्कार व विशेष नैपुण्य पुरस्कार या पुरस्कारांऐवजी आता ''बाल शक्ती'' व ''बाल कल्याण'' हे पुरस्कार देण्याचे केंद्र शासनाने जाहिर केले आहे. त्यासाठी याही वर्षी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

            बाल शक्ती पुरस्कारासाठी शिक्षण, कला, सास्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 5 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या मुलांना हा प्रस्ताव सादर करता येईल.

            बाल कल्याण पुरस्कारासाठी वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा वेतन न घेता मानवसेवी या भावनेतून कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुस्कार देण्यात येतो. तर संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. तसेच बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्याने कार्य करणारी असावी.

            या पुरस्कारासाठीचे निकष केंद्र शासनाच्या  www.wcd.niv.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबतची अधिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयातील दूरध्वनी क्र. 02362-228869 येथे संपर्क साधावा. तसेच सदर पुरस्काराचे प्रस्ताव वरील दिलेल्या संकेत स्थळावरुन ऑनलाईन दि. 15 सप्टेबर 2020 पर्यंत स्विकारले जाणार आहेत.  विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तरी ईच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000

  

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'