ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी १० डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्ग, दि. २७ : जिल्ह्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) OBC, VJNT व SBC प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बारावी नंतरच्या प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक १० डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, या कार्यालयात जमा करावेत. तरी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकात केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'