भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथे आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधवांसाठी १६ नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला येथे विशेष कार्यक्रम व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर. व्ही. गवल, नायब तहसीलदार (महसूल) के. ए. जोशी, अधिवक्ता व्ही. एस. कोदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. बी. मोरे, पंचायत समितीच्या पर्यवेक्षक एस. एस. गोसावी, ओएससी सिंधुदुर्गच्या एस. आर. पोकळे, सहायक समन्वय अधिकारी अक्षय कानविंदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण येथील वरिष्ठ लिपिक रोशन डिसोजा आदी उपस्थित होते. यावेळी रोशन डिसोजा यांनी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाची माहिती देऊन पेण प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. बाल विकास प्रकल्प अधिकारी, ओएससीच्या प्रतिनिधी तसेच उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये आदिवासी बांधवांना विविध शासकीय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि महिलांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. या मार्गदर्शन शिबिराला वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे, त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'