सावंतवाडीत 10 नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी पहाट’ सांस्कृतिक कार्यक्रम
सिंधुदुर्ग, दि. 3 (जिमाका) : दीपावली सणानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर, मेन रोड येथे ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, सावंतवाडी व परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
00000
Comments
Post a Comment