सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध
सिंधुदुर्ग, दि. ४ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक १४५, दिनांक ३० जानेवारी २०२६ अन्वये मंजूर करण्यात आला आहे. सदर अहवाल जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांनी या वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment