उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : सन 2025-26 करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच पात्र ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव तीन प्रतीमध्ये दि. 25 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'