निवृत्तीवेतनधारकांसाठी सिंधुदुर्ग कोषागार कार्यालयात 3 सप्टेंबर रोजी ‘महा-उपलब्धी’ अॅप कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या विविध अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे गुरुवार, दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांना ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) मोबाईल अॅप बाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या त्यांच्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील तसेच उत्पन्नाचा दाखला PDF स्वरूपात उपलब्ध करून घेता येणार आहे. अॅपची नोंदणी व वापराबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर 2026 पासून ‘महा-उपलब्धी’ अॅपच्या माध्यमातून हयात दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हे अॅप निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा तसेच त्रैमासिक बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) संजय गोविंद घोगळे यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'