इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी विशेष बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच समाज विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांना योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार, दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी आरक्षित समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच समाज विकासासाठी कार्यरत विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'