जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक आदिवासी दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी नाग्या महादू वसतिगृह, वेताळबांबर्डे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ए. जी. देशिंगकर तसेच नाग्या महादू वसतिगृहाचे अध्यक्ष उदय अहिर उपस्थित होते. श्री. देशिंगकर यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीवर आधारित गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नाग्या महादू वसतिगृहाचे अध्यक्ष उदय अहिर यांनी केले. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'