आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जिमाका) :- माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व जयंतीनिमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यात विशेष रक्तदान जनजागृती, आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ नर्सिंग,वाडी हुमरमळा, येथे भव्य जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष भुपतसेन सावंत, कॅम्पस डायरेक्टर ऋतुजा परब, प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, डॉ. रामचंद्र नागरगोजे, डॉ. सरिता ठाणेकर, डॉ. प्रियेश पाटील, डॉ. सौरभ पाटील, डॉ. धनंजय भोसले, डॉ. मोनालिसा वजराटकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. वृषाली माळी , प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी निरोगी राहण्याकरीता आदर्श जीवनशैली सर्वांनी अंगिकृत करुन, नियमित व्यायाम व सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच रक्तदानाचे मानवी जीवनातील महत्त्व, आरोग्य तपासणीचे फायदे आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'