माजी सैनिकाकडून 52 व्या वाढदिनी 5200 रुपयांची ध्वज निधीस देणगी

सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जिमाका) : सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तसेच अपंग माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पुनर्वसनासाठी दरवर्षी ध्वजदिन निधी संकलित करण्यात येतो. या उपक्रमाला हातभार लावत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथील लिपिक-टंकलेखक तथा माजी सैनिक प्रसाद नरहरी राणे (रा. तळगाव-राणेवाडी, ता. मालवण) यांनी आपल्या 52 व्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ध्वजदिन निधी संकलन-2025 साठी 5200 रुपये इतकी वैयक्तिक देणगी दिली. या प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते श्री. राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत श्री. सुकटे यांनी त्यांच्या या स्तुत्य योगदानाबद्दल प्रशंसा व्यक्त केली तसेच पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. सुकटे यांनी जिल्ह्यातील नागरिक, माजी सैनिक आणि विविध संस्था यांनी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते योगदान देऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह अपंग माजी सैनिक आणि वीरनारींच्या कल्याणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभारी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'