प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका): दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. असे राष्ट्रध्वज विकत घेऊन दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी व त्यानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार करावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'