रक्षाबंधनासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज; राखी वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जिमाका): रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाने विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये जलरोधक राखी लिफाफे तसेच स्पीड पोस्टची जलद व सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत डाक सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डाक विभागामार्फत विशेष ग्राहक संपर्क, विक्री आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. राखी पाठविण्यासाठी विशेष जलरोधक राखी लिफाफे, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बुक केलेल्या स्पीड पोस्टची ट्रॅकिंग सुविधा आणि घरपोच संकलनाची सोयही उपलब्ध असून, पोस्टमनमार्फत ग्राहकांच्या दारी जाऊन पार्सल संकलित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ‘डाक सेवा-जनसेवा’ या भावनेतून सिंधुदुर्ग डाक विभाग प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हा धागा जलद, सुरक्षित आणि विश्वासार्हपणे पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी राखी पाठविण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपल्या भावंडांपर्यंत प्रेमाचा संदेश वेळेत पोहोचविण्यासाठी आजच जवळच्या डाक कार्यालयात राखी बुक करा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'