'पॉश'ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना नोटीस

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठीच्या ‘पॉश’ (POSH Act-2013) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शासकीय व खासगी कार्यालयांची तपासणी मोहीम सुरू आहे. जून 2026 पासून आतापर्यंत राज्यातील 3 हजार 579 शासकीय व 3 हजार 296 खासगी, अशा एकूण 6 हजार 875 कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. आवश्यक पूर्तता न केलेल्या 294 शासकीय व 378 खासगी, अशा 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 171 शासकीय व 117 खासगी, अशा एकूण 288 कार्यालयांची तपासणी करण्यात आली असून, आवश्यक पूर्तता न केल्याबद्दल 3 खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय व खासगी कार्यालयांनी SHE BOX पोर्टलवर नोंदणी, अंतर्गत समितीची स्थापना व नोंदणी, समिती व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच वार्षिक अहवाल सादर करणे आदी बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. पूर्तता न करणाऱ्या कार्यालयांवर कायद्यानुसार 50 हजार रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'