तक्रार निवारण समितीची सभेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. यानुसार, प्रत्येक महिन्यात तक्रार निवारण समितीची सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी गुरुवार, दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) द्वारे होईल.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या सभेसाठी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment