केंद्र शासनाची मोफत कोचिंग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या वतीने डीएनटी, एनटी व एसएनटी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग SEED योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.buddy4study.com/application/FCDNT2/instruction या लिंकवर ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदणी करण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- डीएनटी, एनटी व एसएनटी विर्द्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वाषिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी राज्य सकरकार व केंद्र सरकार च्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेत नसावा.
अधिक माहितीसाठी विद्यार्थांनी mosje@buddy4study,com या ईमेलवर किंवा 080-474-95118 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
0000
Comments
Post a Comment