कल्याण संघटक यांचा मासिक दौर

ा सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.): माहे जुलै 2025 पासून सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्याकरीता तसेच कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने सर्व योजना व सर्व सवलतींची माहिती देण्याकामी कल्याण संघटक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे पुढीलप्रमाणे दौरे आयोजित केले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. प्रत्येक महिन्याचे निश्चित वार व ठिकाण पुढीलप्रमाणे :- प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा मंगळवार सावंतवाडी तालुका (स्थळ, सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी) प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शुक्रवार दोडामार्ग तालुका (स्थळ, तहसिल कार्यालय, दोडामार्ग) प्रत्येक महिन्याचा दुसरा बुधवार कुडाळ, वेंगुर्ला व मालवण तालुका (स्थळ, तहसिल कार्यालय, कुडाळ) प्रत्येक महिन्याचा तिसरा मंगळवार कणकवली, वैभववाडी व देवगड (स्थळ, तहसिल कार्यालय, कणकवली). वरीलप्रमाणे कल्याण संघटक दौऱ्यांच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायं. 4 या वेळेत उपलब्ध असतील. तरी माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी त्यांचा अडी-अडचणी संदर्भातील मुळ कागदपत्र व छायांकित प्रती, ओळखपत्र, डिचार्ज पुस्तक इत्यादी कागदपत्रांसह दौऱ्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे व आपल्या अडअडचणीचे निवारण करावे, दौऱ्याच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यादिवशी दौरा होणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वीनी क्रमांक 02362 228820, 8219285788 वर संपर्क करावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'