मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय खोटा
सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :-"मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण (CM YKPY)" या योजनेचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्षे इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमातून प्रसारीत होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. समाज माध्यमांवर प्रसारीत होणारा शासन निर्णय निखालस खोटा असून प्रशिक्षणार्थ्यांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या फसवणुकीचा तसेच दिशाभुल करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्षे करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नसल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.इ. तडवी यांनी दिली आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या कामाचे प्रशिण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दि. 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्यवे "मुख्यमंत्री युवा काय्रप्रशिक्षण योजना (CM YKPY)"कार्यान्वित करण्यात आली आहे. दि. 10 व 11 मार्च 2025 च्या शासन निर्णयान्वये सदर योजनेचा 6 महिने असणारा कालावधी वाढवून एकूण 11 महिने करण्यात आलेला आहे.
तरी या अनुषंगाने संबंधित प्रशिक्षणार्थी, सर्वसामान्य नागरीक, योजना राबवित असलेल्या शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापना, यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच लाभधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याकरीता सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्री.तडवी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment