शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा 2025 अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार इ.3 री ते 10 वी (वयोगट 08 ते 14 वर्षे)साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा-2025 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर जनेतेच्या सूचना व अभिप्राय मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य आर.व्ही कांबळे यांनी दिली आहे. या मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. 28 जुलै पासून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. या शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा 2025 बाबत आपले अभिप्राय दि. 27 ऑगस्ट 2025 पर्यंत https://forms.gle/2rgGA37iYKfJUYKS6 लिंकमध्ये ऑनलाईन नोंदविण्यात यावे, असे आवाहन सर्व शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी, संघटना व समस्त समाज घटकांना करण्यात येत आहे. अभिप्राय नोंदविताना अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण असाव्यात ज्यामध्ये विषय, इयत्ता, स्तर, संबंधित पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील मजकूर, अपेक्षित बदल, दुरुस्ती, बदलाचे कारण, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश आसावा तसेच त्यामध्ये आलपे नाव, दूरध्वनी, ई-मेल, पत्ता इत्यादी तपशील देण्यात यावा, अशी विनंती. अभिप्राय पोस्टाने पाठवायाचे असल्यास त्यावर शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित),मसुदा -2025 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून पाठवावेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'