उत्कृष्ट लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतुने जिल्हास्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सन 1985 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी पात्र सुक्ष्म व लघु उद्योजकांनी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अधिकाधिक अर्ज प्राप्त होऊन जास्तीत जास्त उद्योजकांना या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचीसंधी प्राप्त व्हावी, याकरिता आता अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यं मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे.
या योजने अंतर्गत पथम पुरस्कार विजेत्यास रोख रु. 15 हजार सन्मानचिन्ह, व व्दितीय पुरस्कार विजेत्यास रोख रु. 10 हजार सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते.
या योजनेअंतर्गत 2024 च्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे :-
अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि.1 जानेवारी 2021 रोजी किंवा त्यापुर्विचा स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत, पार्ट-2 ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा. मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदार घटक यापूर्वी राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य.
00000
Comments
Post a Comment