कार्यालयात उशिरा आलेल्या 68 कर्मचाऱ्यांना नोटीस
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवार दि. 14 जुलै 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता अचानक भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकाची तपासणी केली.
कार्यालयीन वेळ सुरु झाल्यानंतरही काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उशिरा कार्यालयात उपस्थित झालेल्या एकूण 68 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या, असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) किशोर काळे यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment