ई आर 1 विवरणपत्र 31 जूलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे माहे जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 विवरणपत्र प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 वर संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment