अनुसूचित जाती विद्यार्थ्यांकडून फी वसुली केल्यास महाविद्यालयांवर फौजदारी कार्यवाही होईल
सिंधुदुर्गनगरी,दि.10 (जि.मा.का.): शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता महाडिबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर योजना व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसुचित जाती विद्यार्थ्याकडुन सक्तीने फी वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याण चे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर योजना व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसुचित जाती विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणेची प्रक्रीया सुरू असून अनुसुचित जाती विद्यार्थ्यांकडून फी वसुली करु नये याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरीष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांना पाठविण्यात आलेल्या पत्राची अंमलबजावणी सर्व महाविद्यालयांनी करावी.
तसेच महाविद्यालयातील प्रवेशित अनुसुचित जाती विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुली करू नये, तसेच शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त झालेली नाही या कारणास्तव कोणत्याही प्रकारची अनुसुचित जाती विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालयांनी अडवून ठेवण्यात येऊ नये. याबाबत विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक व राजकीय संघटना यांची तक्रारी आढळून आल्यास याबाबत महाविद्यालयास व्यक्तीःश जबाबदार ठरविण्यात येईल व महाविद्यालयांवर नियमानुसार फौजदार स्वरूपाच्या कार्यवाही करण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment