वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २३ (जिमाका) :- राज्य शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत तसेच नव्याने स्थापन झालेल्या राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाजासाठी) व पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाजासाठी) यांच्या मार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी दिली. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. १ लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित फरतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व २५ टक्के बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु १५ लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता विविध कर्ज योजनांचे जिल्हा कार्यालय उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना (भौतिक उद्दीष्ट-५०) व २५ टक्के बीज भांडवल योजना (भौतिक उद्दीष्ट-१) या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत. रु. १ लक्ष थेट कर्ज योजना :- लाभार्थीना कर्ज महामंडळातर्फे दिले जाते कर्ज परत फेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५५ वर्षे आहे, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकाराण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु. २०८५/- २५ टक्के बीज भांडवल योजना :- कर्जांची उच्चतम मर्यादा रु. ५ लक्ष पर्यंत असून कर्ज परत फेडीचा कालावधी ५ वर्षे आहे.अर्जदाराचे वयाची मार्यादा १८ ते ५० वर्षे आहे. बॅकमार्फत लाभार्थींना ७५ टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग २५ टक्के सहभाग असून महामंडळाच्या कर्जरक्कमेवर व्याजाचा ४ टक्के दराने कर्जाची परतफेड करावयाची आहे. या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे :- पासपोर्ट २ फोटो, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला. (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मार्यादा रु. १ लक्ष),सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रामणपत्र (विजाभज व वि.म.प्र), दरपत्रक (कोटेशन),प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत, नगरपालिका) व्यवसाय करण्याबातचे ना हरकत प्रमाणपत्र,डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकांचे संमती पत्र व व्यवसायाच्या जागेचा ॲसेसमंट उतारा, कागदपत्रे लागतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना “(भौतिक उद्दीष्ट-५०) व गट कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट -१) योजनांकरिता महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखला करता येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१५.लक्षपर्यंत) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. १५ लाखापर्यंत मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधारलिक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावर्धी ५ वर्षे असेल. या योजनेसाठी अर्जदाचे वय १८ ते ५० असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मार्यादा रु.८ लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार सलग्न बँक खाते असणे अनिवार्य, महामंउळाच्या www.vjnt.in (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र दिले जाईल. अर्जदारास आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल. गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १०.०० लक्ष ते ५०.०० लक्ष पर्यंत) :- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतीतील उमेदवारांच्या बचत गट भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. १०.०० लक्ष ते रु. ५०.७० लाखापर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय १८ ते ४५ पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा. परतफेडीचा कालावधी मंजूर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो. कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यानंतर (१२ टक्के मर्यादित) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.in (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल. तरी इच्छूक, गरजू विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या योजनांच्या अधिक माहितीकरीता, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिधुदुर्गनगरी, येथे किवा ई-मेल: dmynyjntsindhu@gmail.com दूरध्वनी : ०२३६२-२२८१५६ संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'