विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला नागरिकांशी संवाद

सिंधुदुर्गनगरी दि 05 (जिमाका) सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्याल्यात 'पालकमंत्री कक्षा'ची स्थापना करण्यात आलेली आहे. आज या कक्षात पालकमंत्री नितेश राणे यांना विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पीक नुकसान, वीजेची समस्या, साकव पुलाची मागणी, तांडा वस्ती सुधार योजनेची कामे, वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती, रुग्णवाहिका चालकांच्या समस्या, पी.एम. विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणे, जिल्हा परीषदेतील पद भरती, रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण अशा विविध विषयांवरील निवेदनांवर पालकमंत्री श्री. राणे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन आले होते. श्री. राणे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'