उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): टोपीवाला स्मारक तंत्रशाळा-तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या शासकीय संस्थेतून शैक्षणिक सत्र 2007 पासून ते शैक्षणिक सत्र 2021 पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड फॅशन डिसायनिंग या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जाण्याचे आवाहन टोपीवाला स्मारक तंत्राशाळा- तंत्रमाध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.फ. पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी त्वरीत ओळखपत्र व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गूणपत्रिका कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6 वा.पर्यंत व शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत, व सुट्टचे दिवस वगळून घेऊन जावे. कार्यालयीन दुरध्वनी संपर्क 02363-272076, प्रशिक्षण विभाग मोबा. 7798576769 या क्रमांवार संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'