जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला. स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्‍य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली. या स्‍पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्‍या हस्‍ते झाले. नौकानयन स्‍पर्धेत एकुण पाच संघ सहभागी झाले होते. प्रत्‍येक संघात 3 स्‍पर्धकांचा समावेश होता. * सोबत फोटो जोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'