माहे मे करिता मंजूर केरोसिन नियतन किरकोळ रॉकेल विक्रीचे दर
सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का): माहे मे 2022 करिता 100 टक्के केरोसिन नियतन,जिल्ह्यासाठी एकूण 132 के.एल. केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.
तालुका निहाय मंजूर नियतन पुढिलप्रमाणे असून सर्व आकडे किलो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -6, सावंतवाडी -15, वेंगुर्ला -20, कुडाळ -17, मालवण -20, कणकवली -21, देवगड -21, वैभववाडी-12, असे एकूण 132 कि.लो. असल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
0000
सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का): माहे मे करिता जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर दादासाहेब गिते जिल्हा पुरवठा अधिकारी, यांनी जाहीर केले असून, तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर 80.20 रुपये ते 81.15 रुपये या दरम्यान राहणार आहेत.
00000
Comments
Post a Comment