जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
सिंधुदुर्गनगरी दि.1 ( जि.मा.का) : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.एन. मेत्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment