पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 20 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 20 मे 2022 रोजी सकाळी 9 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील बालोद्यानचे भूमिपूजन सोहळा समारंभास उपस्थिती, सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे जिल्हा नियोजन समिती बैठक. दुपारी 2.30 वा. नियोजन समिती नवीन सभागृह येथे पत्रकार परिषद, दुपारी 3 वा. राखीव. दुपारी 3.30 वा. ओरोस येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी 4 वा. कुडाळ नवीन बस आगार शेजारी, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा कृषि महोत्सव सांगता समारंभास उपस्थिती, सायं. 5 वा. कुडाळ येथून मोटारीने ओरस- सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. शिवसेना जनसंपर्क कार्यालय, ओरस येथे विविध संघटनांचे प्रतिनिधी, शिवसेना कार्यकर्ते व अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव. सायं. 7.30 वा. ओरस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'