कोविड 19 मुळे झालेल्या अनाथ बालकांना पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन लाभ व सेवा किट प्रदान

सिंधुदुर्गनगरी दि. 29 (जि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सोमवार दिनांक ३० मे रोजी होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमात कोवीड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांना लाभ व सेवा बाबत किट प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी. काटकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ९.४५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात कोविड १९ च्या महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक, कायदेशीर पालक, दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, म्हणून PM Care For Children Scheme योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उद्या सोमवारी ३० मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ व सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये बालकांना PM Care For Children Scheme चे पासबुक, PM-JAY हेल्थ कार्ड / आयुष्यमान कार्ड, पतंप्रधानांचे मुलांना पत्र आणि मुलांचे पीएम केअर स्नेह पत्र यांचा किटमध्ये समावेश आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'