क्रीडा साहित्य वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): नेहरु युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्‍ह्यातील युवक मंडळांनी कार्यालयास संपर्क साधून क्रीडा साहित्‍य वाटप करण्‍याचा फॉर्म भरुन द्यावा,असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यानी केले आहे. दरवर्षी जिल्‍ह्यात युवक मंडळांना क्रीडा साहित्‍याचे वाटप करण्‍यात येत असते. युवक मंडळांना व क्रीडा मंडळ, महिला मंडळ यांनी क्रीडा साहित्याचा फॉर्म भरुन देण्यात यावा. तसेच क्रीडा साहित्यसाठी मंडळाचा शिक्का असणे आवश्यक आहे. नवीन मंडळ संलग्न करण्यासाठी कमीत कमी 7 सदस्य व सदस्यांचे वय 15 ते 29 वर्ष असावे, अध्यक्ष, उपअध्यक्ष व सचिव यांचे वय 18 ते 29 वर्ष असावे,रजिस्टर किंवा अनरजिस्टर असले तरी चालेल. सर्व सदस्यांचे आधार कार्ड व सर्व सदस्य एकाच गावाचे असावेत. ज्या संस्था, युवक मंडळांना क्रीडा साहित्य हवे आहे, त्यानी नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील कार्यालयाचा 02362295012 या क्रमांकावर 25 मे पर्यंत संपर्क करुन क्रीडा साहित्य वाटप फॉर्म भरुन द्यावा यामधून निवड झालेल्या मंडळाना क्रीडा साहित्य वाटप करण्यात येणार आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'