शेतकरी, फळरोपवाटीकाधारकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडांची कलमे, रोपे यांची खरेदी अधिकृत परवानाधारक रोपवाटीकेमधूनच करावी. कलमे, रोपे खरेदी केल्यानंतर विहीत नमुन्यातील खरेदीची पावती घ्यावी. तसेच संबंधीत रोपवाटीकाधारकाकडे कलमे, रोपे विक्रीचा परवाना असल्याची खात्री करूनच कलमे, रोपे खरेदी करावीत. तसेच रोपवाटीकाधारकांनी कलमे, रोपे यांची विक्री केल्यानंतर खरेदीदारांना विहीत नमुन्यातील पावती द्यावी. केवळ परवाना घेतलेल्या कलमे, रोपांची गुणवत्तायुक्त कलमे, रोपे तयार करून विक्री करावी, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी अचित आडसुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. 00000 --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'