पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव. दुपारी 2.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वा. आमदार दीपक केसरकर यांचे संपर्क कार्यालय, श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी येथे एबीपी माझा न्यूज चॅनेल आयोजित प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोली, गोवा कडे प्रयाण. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'