अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.)- महाराष्ट्र राज्य,अनुसूचित जाती जमाती आयोगाचा गुरुवार दिनांक 12 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज .मो. अभ्यंकर असून आर.डी. शिंदे सदस्य (सेवा), के.आर. मेढे सदस्य (सामाजिक व आर्थिक ) यांचा समावेश आहे. यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.12 मे रोजी मुंबई येथून सकाळी 5.10 वाजता जनशताब्दी एक्सप्रसने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12.18 वाजता कुडाळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी 1 ते 3 जिल्हा परिषद, सभागृह येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांच्यासोबत आढावा बैठक. दुपारी 3 ते 4.30 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हयांचा जिल्हा पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्यासोबत आढावा व चर्चा. दुपारी 4.30 ते 5.30 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा.रात्री 8.02 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'