केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान साधणार संवाद

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का): भारतीय स्‍वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्‍सवानिमित्‍त भारत सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थ्‍यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशव्‍यापी संवाद मंगळवार दि. ३१ मे रोजी सकाळी 9 वा. आयोजित करण्‍यात आला आहे. यावेळी पंतप्रधान श्री. मोदी हे देशातील कोणत्‍याही राज्‍यामधील कोणत्याही जिल्‍ह्यातील योजनेचा लाभ घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्‍याअनुषंगाने जिल्‍ह्यातील केंद्र शासनाच्‍या विविध योजनांच्या लाभार्थ्यांबाबत संबंधित विभागांनी परिपूर्ण नियोजन केले आहे. भारत सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थ्‍यांशी देशव्‍यापी संवाद संदर्भातील बैठकीत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व विभागांनी तयारी केली आहे. दिनांक ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृाहत पंतप्रधान श्री. मोदी यांच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'