महिला दिनानिमित्त आहार व मानसिक ताणतणाव याविषयी चर्चासत्र
सिंधुदुर्गनगरी दि. 7 ( जि.मा.का) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे स्त्रियांचा आहार व मानसिक ताणतणाव नियोजन यावर हसत खेळत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात मंगळवार दि. 8 मार्च 2022 रोजी दुपारी 3 ते 4 वेळेत हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रामधअये आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी येथील प्राध्यापिका डॉ.मुग्धा ठाकरे या उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
तसेच नोकरी करणाऱ्या महिलांच्या मनःशांतीसाठी तसेच आरोग्यासाठी उपयुक्त दैनंदिन आयुष्यात करता येऊ शकणारे योगाच्या प्रकारांचे प्रात्यक्षिकही यावेळी आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास फिजीओथेरपिस्ट डॉ. अपुर्वा वाडीकर या मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्हा मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोमनाथ रसाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment