व्यवसायकर 31 मार्च पूर्वी भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): महारष्ट्र राज्य व्यवसायकर कायदा 1975 नुसार नावनोंदणीकृत, नोंदणीकृत असलेल्या व्यक्ती व मालकासाठी व्यवसायकर विभागाव्दारे नोंदित व्यवसायकर दात्यांसाठी विलंब शुल्क माफी योजना आणली असून ज्या आस्थापनांची माहे डिसेंबर 2021 पर्यंतची व्यवसायकराची विविरणपत्रके प्रलंबित आहेत. अशी सर्व विवरणपत्रे विलंब शुल्क न भरता केवळ कर व व्याज भरुन 31 मार्च 2022 पर्यंत भरुन विलंब शुल्क माफीचा लाभ घ्यावा, असे अवाहन कोल्हापूर क्षेत्राचे राज्यकर सहआयुक्त(व्‍यवसायकर) समरजीत आ. थोरात यांनी केले आहे. तसेच विहित मुदतीत करभरणा व विवरणपत्र सादर न केल्यास सदर कायद्यानुसार कर, व्याज,शास्ती किंवा शुल्क यांसह रक्कम वसुल करण्याची कारवाई करण्यात येईल याची सर्व नावनोंदित व नोंदणीकृत व्यक्ती व मालकानी नोंद घ्यावी. त्याच बरोबर अनोंदित व्यक्ती व मालक यांनी व्यवसायकर कायद्यांतर्गत नोंदित होऊन करभरणा करावा व राष्ट्र उभारणी कार्यास सहकार्य करावे. जिल्ह्यातील सर्व व्यवसायकर दात्यांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय कर भरताना काही अडचणी आल्यास जवळच्या व्यवसाय कर कार्यालयास भेट द्यावी, अथवा pttechnicalissue@gmail.com या मेल आयडीवर ई-मेल करावीत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'