जिल्ह्यात 16 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता नागरिकांना खबरदारीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का): प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यानी दिलेल्या पुर्वसूचनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.14 मार्च ते 16 मार्च 2022 या कालावधीत तापमानात वाढ होणार असून या तीन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नारिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. काय करावे · तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. · हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावी. · बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा. · प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. · उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करवा, तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकवा. · शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबु-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा. · अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. · गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्याना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. · घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करवा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. · पंखे, ओले कपडे यांचा वापर करवा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. · कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. · सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. · पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. · बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. · गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी. · रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभाराववित. · जागोजागी पाणपोईची सुविधा करावी. काय करु नये · लहान मुले किंवा पाळीव प्राण्याना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. · दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. · गडत, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. · बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावित, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. · उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घरची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'