मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदांची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी दि. 10 ( जि.मा.का) : मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकरी व सूचना मागवणे, सुनावणी देणे कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने या तिन्ही नगरपरिषदांची प्रारुप प्रभाग रचना आदेशाचा नमुना रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच सबंधित नगरपरिषद कार्यालयात लोकांच्या माहितीसाठी सदर मसुदा कार्यालयीन वेळेत खुला ठेवण्यात आला आहे. या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास, त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन गुरुवार दि. 17 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या नावे पाठवावे. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्जा विचारात घेतले जाणार नाहीत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'