जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहिर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक या प्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्यचा ग्रामसेवक यांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात येतात. देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, प्रदिप रमेश नारकर,व कुडाळ तालुक्यातील कवठी ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, सतिश श्रीधर साळगावकर,व मालवण तालुक्यातील कातवड,घुमडे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, युती युवराज चव्हाण. तर कणकवली तालुक्यातील नरडवे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, वैभव विनायक धुमाळ.व दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचातीचे ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब. व वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, शरद श्रीरंग शिंदे. व वैभवाडी तालुक्यातील गडमठ, ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, सुनिल मनोहरराव नागरगोजे. सावंतवाडी तालुयातील आंबेगाव, ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, अमित आत्माराम राऊळ . यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'