स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ - सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
सिंधुदुर्गनगरी दि.21(जि.मा.का): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांकरीता अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्याना 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील हद्दीपासुन 5 कि. मी. परिसरात असलेली महाविद्यालये,सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकिय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने या योजनेअंतर्गत विद्यार्थी वंचित राहू नये, म्हणुन इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ 31 मार्च 2022 अखेर करण्यात येत आहे. विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग दुरध्वनी क्र. 02362-228882, वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. घाटे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment