शिष्‍यवृत्‍ती योजनेसाठी अर्जकरण्‍यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि.21 (जि.मा.का): सन 2021-22 करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणेकरिता शासनाने अनु. जाती,इमाव,विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ दिली आहे.असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करावेत,व संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यवाही करावी,तसेच शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय दूरध्वनी क्र. 02362 228882 येथे संपर्क साधावा,असे अवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'