पथनाट्याच्या माध्यमातून योजनांचा जागर सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी दि. 14 (जिमाका) :- दोन वर्ष जनसेवेची, महा विकास आघाडीची अंतर्गत शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा जागर जिल्ह्यात सुरू आहे. पथनाट्याच्या माध्यमातून आज सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात हा योजनाचा जागर करण्यात आला. त्यास महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 9 मार्च पासून जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांचा जागर लोककलांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आज सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग, आडाळी, येथे चैतन्य महिला विकास मंडळाच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. मालवणी भाषेतून होत असलेल्या या सादरीकरणास स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व तळवडे, वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, भूईबावडा येथेही कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलावर्गानेही प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे हे अभियान माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हाभर सुरू आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे यांचे विश्राम अदिवासी कला अंगण ट्रस्ट, शाहीर कल्पना माळी आणि चैतन्य महिला विकास मंडळ या संस्था जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये या कार्यक्रमाचे सादरीकरण करत आहेत. * सोबत फोटो जोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'