दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची शाहिरा धरतो ताल, पोवाड्याच्या माध्यमातून सुरू होतो लोक जागर
सिंधुदुर्गनगरी दि. 10 ( जि.मा.का) : "दोन वर्ष जनसेवेची | महा विकास आघाडीची | महाराष्ट्र शासनाची | जनतेचा विश्वास सार्थ केला | सर्वांगीण प्रगती विकासाला | दोन वर्ष जनसेवेला ||जी||" या बोलासह शाहिर धरतो ताल, सांगतो महाराष्ट्र शासनाची दोन वर्षातील लोक कल्याणाची गाथा आणि सुरू होतो योजनांचा लोक जागर.
महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना... ते लोकांच्या भाषेत लोक कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांचा जागर अभियान सुरू आहे.
राज्यात कोरोनाची साथ पसरली असतानाही राज्य शासनाने या साथीचा खंबिरपणे मुकाबला केल्याचे सांगून शाहिर या साथीमध्ये शासनाचे आरोग्य सेवेचे केलेले मजबुतीकरण, वादळ असो वा पूर अशा नैसर्गिक आपत्तींचाही समाना खंबीरपणे कसा केला याची माहिती उपस्थितांना देतो. मग ते गितातून शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, दिव्यांगासाठीच्या योजना, पशुसंवर्धन, शेतकऱ्यांसाठीच्या योजना सांगतो. रमाई आवास योजना, पेय जल योजना सगळ्या योजना कधी गीत, कधी पोवाडा, कधी गवळन या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचतात.
सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू माणून शासन कशाप्रकारे काम करत आहे याचीही माहिती पोवाड्याच्या माध्यमातून शाहिर सादर करतो. पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे विश्राम अदिवासी कला अंगण ट्रस्ट, शाहिर कल्पना माळी आणि चैतन्य महिला विकास मंडळ या संस्था लोक जागर अभियानाचे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये सादरीकरण करत आहेत.
* सोबत फोटो जोडला आहे.
00000
Comments
Post a Comment