महिला दिनानिमित्त अंगणवाडी पुरस्कारांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी दि. 7 ( जि.मा.का) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या पर्यावेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात मंगळवार दि. 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच बेटी बचाओ - बेटी पढाओ कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत बचतपत्र वितरणही करण्यात येणार असल्याची माहिती, संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास यांनी दिली. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'