मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी दि 16 (जिमाका) सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, उप अभियंता अजित पाटील, मे. राम सुतार आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभुगावकर, स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी.एन. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सुरज गिरी, अभियंता श्री बावणे आदी उपस्थित होते. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'