सामाजिक न्याय दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती व सामाजिक न्याय दिन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मानाचा मुजरा करण्यात आला. या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, वरिष्ठ समजा कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचारी व विविध महामंडळातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी शाहू महाराज बद्दल मनोगत व्यक्त केले, तसेच या कार्यालयाचे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याबद्दल उपस्थितांना मौल्यवान अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सर्व महामंडळे तसेच समाज कल्याण कार्यालय यांना भेट देवून अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. या कार्यालयाच्या अधिनस्त सर्व वसतिगृहांमध्ये, आश्रमशाळामध्ये, महाविद्यालयांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत 26 जून सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या घर घर संविधान उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये एकूण 50 संविधान उद्देशिकेच्या प्रतिमा वाटप करण्यात आल्या. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'