जिल्हास्तरीय सुबोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका) :- सुब्रोतो मुखर्जी एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीव्दारे सन 2025-26 या वर्षी आयाजित करण्यात येणाऱ्या 64 वी आंतरराष्ट्रीय सुबोता मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर,ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयाजित होणार आहेत. या स्पर्धा 15 वर्ष खालील मुले (सब ज्युनियर) व 17 वर्ष खालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 3 जुलै 2025 रोजी 15 वर्ष खालील मुले (सबज्युनियर) 17 वर्ष खालील मुली (ज्युनिअर) व 4 जुलै 2025 रोजी 17 वर्ष खालील मुले (ज्युनिअर) सकाळी 9 वाजता कुडाळ तालुक्यातील श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व शाळांना, संघानी सहभागापुर्वी sindhudurga.mahadso.co.in/school या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्राथमिक नोंदणी प्रवेश फी व ऑनलाईन प्रवेशिका भरलेल्या नोंदणीकृत संघांनाच या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी यांची नोंद घेऊन व आपला फुटबॉलचा संघ घेऊन वेळेवर स्पर्धा ठिकाणी उपस्थिती रहाण्याचे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळ यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'